Tuesday 18 September 2012

]]]] संजय सोनवणी यांना जाहीर पत्र ]]]]]]]]]


श्रीमान संजय सोनवणी
स न वि वि
आपण छत्रपती संभाजी महाराजांची जी  दुर्दैवी अखेर झाली या बाबत
जी ऐतिहासिक साधने आणि ज्या तर्कांच्या आधारावर जे काही निष्कर्ष काढत
आहात ते गैरसमज निर्माण करणारे आहेत.
     आपण म्हणता त्या प्रमाणे संभाजी महाराजांबद्दल रायगडावरील मुस्तद्यात ताण-तणाव, रोष, बेबनाव ,अविश्वास आणि सुडाच्या भावना होत्या याबद्दल दुमत नाही.  संभाजी महाराजांच्या परखड, शीघ्रकोपी, प्रसंगी अततायी स्वभावामुळे आणि खलबत खाण्यातील कुटनीती,किंवा  दरबारी राजकारण या पेक्षा मैदानावरील लष्करी बाहुबळ महत्वाचे मानण्याच्या वृत्तीमुळे , शिवाजीमहाराजांच्या सोबत कामकरणार्या
दरबार्याना शंभू अति धाडसाच्या कैफात राज्य बुडवील ( राज्य बुडाले तर आपले काय ? ) अशी भीती वाटत होती हें स्वराज्याच्या अस्तित्व आणि सुरक्षे  पेक्षा स्वतःचे बुड टेकवायला सुरक्षित जागा शोधणारे दुसरे तिसरे कुणी नाही तर
सह्याद्रीच्या कुशीतल्या मावळ पोरांनी रक्त सांडून उभारलेल्या रायगडावर कानात मोत्याच्या भिकबाळ्या आणि डोक्यावर रेशमी पगड्या घालून मिरवणारे अष्टप्रधान मंडळात मानाच्या जागा पटकावलेले तथाकथित मुस्तद्दीच होते.
( आणि हें सर्व ब्राम्हण होते/ वाटल्यास हा योगायोग किंवा अपवाद समजा )
       संभाजी महाराजांच्या अटके नंतर त्यांना सोडवण्याचा रायगडावरून काहीही प्रयत्न झाला नाही हें तर सत्यच आहे. त्यांना कट-कारस्थान करून मुकाबार्खानाच्या हवाली करण्यात आले हा देखील सत्य इतिहास आहे.
परंतु असे पहिल्यांदाच घडले होते असे नाही. खुद्द शिवाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाने आग्र्यात नजरकैदेत टाकले तेव्हादेखील रायगडावरील मुस्तद्यानी लष्कराला दैवाचे फासे उलटे पडल्याचे सांगून हातावर हात धरून
निष्क्रिय बसण्यास भाग पडले होते. जिजाऊ मा साहेबांसारख्या पुरोगामी आणि वास्तववादी विचार करणाऱ्या स्त्रीच्या शिवाजी महारा
जांविषयी हळव्या असणाऱ्या भावनांचा फायदा घेवून शिवाजी महाराजांच्या सुटकेसाठी
दबावतंत्र किंवा राजकारण करण्यापेक्षा या भटा-बामणांनी जप-आणि अनुष्ठाने घालून रायगडाची राया घालवली होती.
          केवळ आग्रा प्रसंगातच नव्हे तर पन्हाळा आणि नंतर पुरंदर प्रसंगात देखील राजा अडकला आता तो सहजा सहजी सुटण्याची शक्यता नाही हें दिसताच या भटा-बामणांनी लष्कराला गप्प बसण्यास भाग पाडले. मराठे शिपाई या भट-बामनावर श्रद्धा ठेवून असल्याने त्याचा सल्ला मनात असत. जिथे शिवबा आणि मा साहेब यांचा सल्ला मानतात मग आपण यांचे एकलेच पाहिजे ही मावळ्याची भोळी भाबडी भावना होती. त्याचाच फायदा या मंडळीनी घेतला.
        या मंडळीच्या जेव्हा असे लक्षात आले की शिवपुत्र संभाजी जर राजा झाला तर राज्य आपल्या सल्ल्याने चालणार नाही. लष्कराचा सेनापती ( त्यावेळी हंबीरराव मोहिते आणि नंतर संताजी घोरपडे ) आणि संभाजीचा वैयक्तिक सल्लागार / मित्र ( काविकलाश ) यांच्या मुळे आपले स्थान महत्व एशोआराम आणि कमाई कमी होयील तेंव्हा पासून या मंडळीनी संभाजी बद्दल अफवा /कंड्या/ गैरसमज पसरवण्याचे आणि बदनामीचे अभियान चालवले. त्या साठी त्यांनी सोयराबाईच्या मनात सावत्रपनाचे  आणि राज्यलोभाचे बीज फुलवले. जिजाऊ मा साहेबांच्या
निधनानंतर तर सोयराबाईंचा महाल कट कारस्थानाचा अड्डाच बनला. त्यांच्या कारवायांनी शिवाजी महाराज सुध्धा हतबल झाले. खचले, आजारी पडले ( की पाडले गेले ) . या मंडळीनी जिथे प्रत्यक्ष पतीच्या विरोधात पत्नीच्या मनात विष कालवले ( शिवाजी महाराज- सोयरा बाई ) , मदारी मेहतर आणि होरोजी फर्जद सारखे शिवाजी महाराजांचे विश्वासू कटात सामील करून घेतले तिथे संभाजी महाराजांच्या विरोधात कट कारस्थाने करण्या साठी काय काय केले नसेल आणि कुणा कुणाचा बुद्धिभेद केला नसेल ?
         संभाजी महाराजांना मार्गातून हटवण्याचा संगमेश्व्ह्रचा प्रयत्न यशस्वी झाला परंतु त्या आधी असे अनेक प्रयत्न झाले. शिवाजी महाराजांची स्त्री विषयक आदर भावना आणि स्त्रीची विटंबना करणार्याला दिली जाणारी कठोर शिक्षा
लक्षात घेऊन पहिला प्रयत्न त्याच बाबतीत झाला. त्या साठी आण्णाजी दत्तो याने खुद्द स्वतःच्या मुलीचा वापर केला. परंतु नंतर सत्य उघडकीस आले. त्यानंतरही पुन्हा एकदा याच आण्णाजी दत्तोने स्वतःच्या साडूच्या मुलीचाही वापर
करून पहिला ( तो ही शिवाजी महाराजांच्या राज्यभिषाकाच्या गडबडीत ) हेतू हा की महाराजांनी एक तर कठोर शिक्षा करून संभाजीला कायमचे संपवावे. किंवा किमान त्याला युवराज म्हणून घोषित करु नये. परंतु हें कारस्थान
देखील फळाला आले नाही. त्या नंतर या मंडळीनी थेट शिवाजी महाराज हेच पहिले टार्गेट ठरवले. आणि त्यांनी  महाराजांच्या मनात संभाजी विषयी आणि संभाजीनाहाराजाच्या मनात महाराजांविषयी अविश्वास आणि गैरसमज
पसरवण्यास सुरुवात केली. गैरसमज एवढे टोकाचे होते की एक वेळ अशी आली की शिवाजी महाराजांना असे वाटू लागले की संभाजी आपल्या विरुध्ध बंड करून आपल्याला मरून किंवा तुरुंगात टाकून राज्य बळकावण्याची
तयारी करतोय आणि संभाजीला असे वाटत होते की आपला पिता कोणत्याही क्षणी आपल्याला अटक करून कायमचे नजरकैदेत किंवा काल कोठडीत टाकेल. या गैरसमजा पोटीच अखेरच्या काळात संभाजी-शिवाजी भेट होऊ
शकली नाही. संभाजी महाराजांकडून मोगलांना जाऊन मिळण्याची चूक घडली. या घटनेने गैरसमजांची जखम आणखीनच चिघळली. अगदी अखेरच्या काळात तर खुद्द शिवाजी महाराजच नजर कैदेत होते. त्याचा मृत्यु
कसा झाला. अंत्यविधी गुप्तपणे का उरकण्यात आला. राजाराम ला गादीवरबसविण्याची घाई कुणी केली ? हें सर्व संशयास्पद आहे.
      या घटनेनंतर संभाजी महाराजांनी पुन्हा रायगडावर ताबा मिळवल्यानंतर आणि हंबीरराव व मराठा लष्कर संभाजी महाराजांच्या पाठीशी आहे हें कळल्यावरही  रायगडावरील भट-कारस्थाने थांबली नाहीत. संभाजी महाराजांना
अकबराच्या ( औरंजेबाचा पोरगा ) हाती देण्याचा प्रयत्न झालाच. त्यात कट उघडकीस येऊन कटाचे सूत्रधार मारले गेले.
परंतु अपप्रवूत्ती बाबत एक नियम आहे. त्याचा एकदा शिरकाव झाला की मग त्या चालवणारा एक मेला किंवा मारला तरी त्याची जागा दुसरा भरून काढतो.संभाजीराजा बद्दल असेच घडले. कट वाल्यांना हत्तीच्या पायी देऊन कारस्थाने थांबली नाहीत. त्यांची संधाने थेट औरंगजेबाच्या दरबारापर्यंत घाटली जात होती. गणोजी शिर्के काय किंवा नागोजी माने काय हें मोहरे होते. खुद्द राजाराम महाराजांना देखील याची कल्पना नसावी की हें जे काही काळ गप्प बसण्यास सांगितले जात आहे या मागे राजकारण नसून कटकारस्थान आहे. लष्कराचे हात बांधण्यामागे मुस्तद्दीपणा नसून संभाजीला मरू देण्याचा हेतू आहे. भटांच्या या कारस्थानं बद्दल राजाराम-, मराठा लष्कर , संताजी धनाजी , खुद्द
संभाजी राजांच्या पत्नी येसूबाई देखील अनभिज्ञ होत्या. या सर्वाना असे वाटत होते की काहीतरी होयील परंतु काहीच होणार नाही हें फक्त भटाना माहित होते.
        संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृतू नंतर  आणि राजाराम यांच्या अकाली निधना नंतर महाराणी ताराबाई यांच्या काळात धनाजी संताजी च्या काळात पुन्हा एकदा मराठा लष्करात चैतन्य आले. त्यात औरंगजेब जेरीस आला, हरला आणि मेला, ज्यांनी औरंगजेबाच्या राहुटीचे कळस कापून आणले त्यांना स्वतःचा राजा सोडवणे अवघड नव्हते .परंतु स्वार्थी  मतलबी   आणि संभाजी द्वेषाने पछाडलेल्या भटांनी आपली अक्कल-हुशारी लष्कराला हातावर हात धरून बसविण्यासाठी खर्ची घातली.
   भटांच्या या कारस्थानाचा अखेरचा आध्याय धनाजी-संताजीच्या बेबनावाने संपला. जो पर्यंत धनाजी-संताजी एक आहेत तो पर्यंत राज्यावर लष्कराचे वर्चस्व राहणार आणि आपला भाव कमी राहणार हें माहित असल्याने भटांनी
या मराठा शिपाई गड्यात दुहीची बीजे पेरून एकमेकांच्या जीवावर उठवले. आणि अखेरीस भट त्यात यशस्वी झाले.
त्याचा परिणाम ''''''' पेशवाई अवतरली ''''''''''
    अगदी गाढवाचा नांगर फिरलेल्या पुण्यात शिवबांनी सोन्याचा नांगर फिरवल्या पासून जी  भट कारस्थानं सुरु झाली
ती जेव्हा शनिवारवाडा उभा राहिला तेह्वाच या भटांचा पोटशूळ शांत झाला
--------------------------------------------------------------------------------------
.
                                                             आपला
                                                        प्रा. रवींद्र तहकिक
                                                          ( संपादक; अनिता पाटील विचारमंच )

No comments:

Post a Comment